आकूरची भाजी

आकूरची पातळ भाजी

आकूर ही गोव्यामध्ये पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. तांबूस हिरव्या रंगाची ही भाजी कोवळ्या अंकुर स्वरूपातच बाजारात येते. पावसाळ्यात नदी काठी आकूर ह्या भाजीचे कोंब उगवतात. चणा डाळ, हिरवे वाटाणे, मसूर अशा वेगवेगळ्या कडधान्यांबरोबर आकूरची अत्यंत चविष्ट अशी पातळ भाजी केली जाते. फक्त खोबऱ्याचे वाटण घालून केलेली ह्या आकूरची भाजी सुद्धा अधिक वाचा

मुगाचे सार

मुगाचे सार

महाराष्ट्रात जसा मटकीच्या उसळीबरोबर कट असतो. तसा गोव्यामध्ये मुगागाठींबरोबर सार केले जाते. फरक इतकाच की हे सार संपूर्ण सात्विक म्हणजे कांदालसणीशिवाय केले जाते. मुगागाठी, मुगाची उसळ, मुगाचे सार, खतखते हे सर्वच पदार्थ सणसमारंभ, धार्मिक कार्ये अशा वेळी बनवले जातात. त्यामुळे हे सर्व पदार्थ सात्विक असतात. मुगागाठी करताना, मूग शिजल्यावर वरचे अधिक वाचा

तवसोळी गोवन पारंपरिक पदार्थ

तवसळी

गोव्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते गणेश चतुर्थीपर्यंत मोठ्या आकाराची काकडी मिळते, तिला तवशे असे म्हणतात. पिवळसर हिरव्या रंगाची आणि फिक्या हिरव्या रंगाची असे तवशाचे दोन प्रकार असतात. ह्या तवशापासून बनवलेला पारंपरिक गोमंतकीय पदार्थ म्हणजे तवसळी. बेळगाव भागात याच तवशाच्या मिरची आणि तांदळाचे पीठ घालून केलेल्या थालीपिठाला तवसोळी म्हणतात. परंतु गोव्यात; गव्हाच्या अधिक वाचा

पातोळ्या: नागपंचमीचा पारंपारिक गोमंतकीय पदार्थ

पारंपारिक गोवन पातोळ्यांची रेसिपी काही पदार्थांची काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली आहे. प्रांतानुसार या पदार्थांच्या आणि सणांच्या जोड्या वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे खास पारंपारिक पदार्थ असतात. गोव्याचेही स्वतःचे खास पारंपारिक पदार्थ आहेत. त्यातील काही पदार्थांच्या विशिष्ट सणांशी जोड्या जमलेल्या आहेत. जसे की, नागपंचमी आणि पातोळ्या, चवथ अधिक वाचा

Ghotache Saansav

घोटाचे सासव

घोटा म्हणजे गावठी आंबा. जो साले काढून चोखून खाल्ला जातो. आंबट गोड चवीच्या ह्या आंब्याचा गोव्यामध्ये बनविला जाणारा पारंपारिक पदार्थ म्हणजे घोटाचे सासव. कोंकणी भाषेत सांसवा म्हणजे मोहरी (mustard seeds). हिंग मोहरीची फोडणी देऊन केलेल्या ह्या पदार्थामध्ये, खोबऱ्याच्या वाटपामध्येही मोहरीचे दाणे घातले जातात. अशाप्रकारे मोहरीची कळेल न कळेल अशी किंचित कडू, आंब्याची अधिक वाचा

बांगड्याचे हुमण (Mackerel fish curry)

बांगड्याचे हुमण (Mackerel fish curry)

हुमण म्हणजे fish curry  हा गोवन जेवणाचा अविभाज्य भाग! त्यात जर हुमण बांगड्याचे असेल तर काय विचारता!! माशाच्या जेवणात बांगडा आणि बांगड्याच्या करीवर प्रेम असलेले लोक अधिक! गोव्यामध्ये हुमण (fish curry) करायची पद्धत मासा कुठला आहे त्याच्यावर ठरते. पारंपरिक पद्धतीने केलेले माशाचे हुमण हे कांद्याचे आणि बिन कांद्याचे असे दोन अधिक वाचा

Velliche Suke

वेल्ल्याचे सुके-पारंपारिक गोवन रेसिपी

गोवा आपल्या समृद्ध सीफूड परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. इथे असंख्य प्रकारचे मासे मिळतात. प्रत्येकाची चव अनोखी! छोट्या माशांमध्ये जे अनेक प्रकार मिळतात त्यातला एक प्रकार म्हणजे वेल्ली/वेर्ली (Silver fish). चंदेरी रंगाच्या ह्या छोट्या रुचकर माशाचे जे विविध प्रकार गोव्यामध्ये बनवले जातात, त्यातीलच एक प्रकार म्हणजे वेल्ल्याचे सुके. वेल्ल्याचे सुके बनवायची पद्धत अधिक वाचा

खतखते, पारंपरिक गोवन पदार्थ

गोवन खतखते रेसिपी: पारंपारिक मिश्र भाज्यांची चविष्ट भाजी

गोवन खतखते – पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ गोव्याचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि रुचकर पारंपारिक  पदार्थ म्हणजे खतखते! जे गोव्याबरोबरच; कोकणांत आणि  महाराष्ट्र, कर्नाटकातील सारस्वत आणि गोव्याशी संबंध असलेल्या इतर समाजात गणेश चतुर्थीला आवर्जून बनवले जाते. गणपतीचा तो आवडता पदार्थ आहे अशीही एक धारणा आहे. श्रावण महिन्यात मिळणाऱ्या, तसेच काही बारमाही अधिक वाचा

Recheado Bangado

रशेद बांगडा (Recheado Bangado)

आपल्या विशेष चवीने बांगडा अनेक लोकांचा आवडता बनलेला आहे. गोव्यामध्ये तर ह्या बांगड्याचे अनेक प्रकार केले जातात. जसे बांगड्याचे सुके, बांगड्याचे आमट तीख, बांगड्याचे हुमण (fish curry) इत्यादी. इतकेच नाही तर बांगड्याचे लोणचे सुद्धा केले जाते. त्यातील आपल्या विशेष चवीने सर्वप्रिय असलेला असा बांगड्याचा एक प्रकार म्हणजे रशेद बांगडा (Recheado अधिक वाचा

Recheado Masala

रशेद मसाला (Recheado masala)

रशेद मसाला (Recheado masala) हा गोवन मसाल्याचा एक प्रकार आहे. रशेदो ह्या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे stuffed. भरलेल्या माशासाठी  ह्या मसाल्याचा वापर विशेषतः केला जातो. माशांबरोबरच चिकन, पनीर आणि भाज्यांमध्येही ह्या मसाल्याचा वापर करता येतो. परंतु ह्या मसाल्याची जोडी परंपरेने माशाबरोबर आणि ती ही बांगड्याबरोबर छान जमते. रशेद बांगडा हा अधिक वाचा

error: Content is protected !!