Goan prawns vindaloo

गोवन प्रॉन्स विंदालू रेसिपी | तिखट-आंबट आणि चविष्ट

प्रॉन्स विंदालू हा गोव्यातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. ताज्या सुंगटांपासून, म्हणजेच कोळंबी किंवा झिंग्यांपासून बनवला जाणारा हा तिखट, आंबट आणि चटपटीत पदार्थ पारंपारिक गोवन खाद्यसंस्कृतीचा एक स्वादिष्ट भाग आहे. चला तर मग, ही चविष्ट गोवन प्रॉन्स विंदालू रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया. गोवन प्रॉन्स विंदालूसाठी आवश्यक साहित्य प्रॉन्स अधिक वाचा

गोवन सान्ना रेसिपी: मऊ, स्पॉंजी आणि हलकी गोवन इडली

सान्ना म्हणजे काय? गोवन सन्ना किंवा सान्ना (Goan Sanna/ Sannas) हा एक अतिशय हलका, स्पॉंजी असा वाफवलेला तांदळाचा केक किंवा इडलीसारखा पदार्थ आहे. गोवा आणि मंगळूर येथील ख्रिश्चन समाजाबरोबरच गोव्यातील हिंदू समाजामध्येही ही गोवन पद्धतीची पारंपारिक इडली अर्थात सान्ना बनवली जातात. ख्रिश्चन बांधवांच्या लग्न समारंभामध्ये तसेच सण समारंभासारख्या विशेष प्रसंगी अधिक वाचा

अळंबीची शाकुती

ताज्या अळंबीची शाकुती : पारंपारिक गोमंतकीय पाककृती

मशरूम म्हणजेच अळंबी, आजकाल बऱ्याच लोकांना आवडते. विशेषतः तरुण मुले मशरूमचे वेगवेगळे पदार्थ आवडीने खातात. परंतु ही अळंबी किंवा मशरूम हे कृत्रिम पद्धतीने पिकवलेले असतात. ह्या कृत्रिम पद्धतीच्या अळंबीपेक्षा ताजी अळंबी अत्यंत चविष्ट लागते. ही ताजी अळंबी पावसाळ्यामध्ये काही दिवस बाजारात आलेली आपल्याला पाहायला मिळते. अस्सल गोमंतकीय पद्धतीने बनवलेली अळंबीची अधिक वाचा

Tisaryache Sukhe

तिसऱ्याचे सुके-अस्सल गोमंतकीय पाककृती

शिंपले, ज्यांना गोव्यामध्ये तिसरे म्हणतात. ह्या शिंपले अर्थात तिसऱ्याचे वेगवेगळे पदार्थ गोव्यामध्ये केले जातात. ह्या तिसऱ्यांची चव लाजवाब असते. आपल्या विशेष चवीने गोमंतकीय मत्स्यस्वादामध्ये तिसऱ्याचे एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे. तिसऱ्याचे सुके, तिसऱ्याचे दबदबीत, तिसऱ्याचे डांगर असे  सर्वच पदार्थ रुचकर लागतात. तिसरे, समुद्री आणि गोड्या पाण्यातही मिळतात. समुद्री पाण्यात अधिक वाचा

Ambyache Dhondas

आंब्याचे धोंडस|आम्याचे धोणस

आंबा फळांचा राजा. आंबा आवडत नाही असा मनुष्य विरळाच. आंब्याच्या मोसमात आंबे कापून खाण्याबरोबरच त्याचे वेगवेगळे पदार्थही करून खाल्ले जातात. आंब्याचा शिरा, आंब्याचा केक, मिल्कशेक, आईस्क्रीम इत्यादी अधिक मागणी असलेल्या पदार्थांबरोबरच गोव्यामध्ये आम्याचे धोणस (आंब्याचे धोंडस), आम्याचे दोणे असे काही पारंपरिक पदार्थही आवडीने करून खाल्ले जातात. त्यातील आंब्याचे धोणस म्हणजे अधिक वाचा

Mango Halwa

आंब्याचा हलवा

गोव्यामध्ये आंब्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात.  माणकूराद आंबा हा तर गोव्यातील आंब्यांचा राजा आहे. तर मुसर्राद नावाचा तांबूस हिरव्या रंगाचा आंबा हा विशेषतः हलवा बनवण्यासाठी वापरला जातो. अत्यंत अप्रतिम चवीचा असा हा गोमंतकीय गोड पदार्थ आहे.  फक्त दोन प्रकारचे साहित्य आणि अत्यंत सोपी पद्धत असलेला हा आंब्यांचा हलवा कसा करायचा अधिक वाचा

Biya bhaji

बिया भाजी: ओल्या काजूंची पारंपारिक गोमंतकीय पाककृती

उन्हाळा सुरु होताच बाजारात आंबे, फणस, जांभळे आदी उन्हाळी मेवा यायला सुरु होतो. ह्या उन्हाळी फळांमध्ये आणखीन एक विशेष मेवा साऱ्यांना आकर्षित करत असतो तो म्हणजे ओले काजू. ओल्या काजूंपासून वेगवेगळे पदार्थ सुगरणी आपल्या पाककौशल्याने बनवत असतात. अशीच एक अत्यंत चटकदार मसालेदार गोमंतकीय पाककृती गोव्यातील गृहिणी ओल्या काजूंपासून बनवतात.  तिला अधिक वाचा

laatad a traditional goan recipe in different shape

लातड: विस्मृतीत गेलेला गोमंतकीय पारंपारिक पदार्थ

गोमंतकीय शाकाहारामध्ये वैविध्य आहे, वैपुल्य आहे. बरेच गोमंतकीय पारंपारिक पदार्थ पिढ्या दर पिढ्या एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे जात आहेत. पुन्हा प्रत्येक पदार्थावर त्या त्या घराचे संस्कार होऊन एकच पदार्थाच्या पाककृतीमध्येही थोडेफार वेगळेपण आढळते. तरीही काही पारंपारिक पदार्थ जुन्या पिढी बरोबर नाहीसे झालेले आहेत. त्यातलाच एक विशेष माहीत नसलेला आणि अधिक वाचा

बांगड्याची उड्डमेथी

बांगड्याची उड्डमेथी

उड्डमेथी ही अत्यंत प्रसिद्ध आणि रुचकर गोमंतकीय पाककृती आहे. कालवणाचा हा गोमंतकीय प्रकार, शाकाहारी आणि मत्स्याहारीसुद्धा आहे. शाकाहारामध्ये आमलीची उड्डमेथी तसेच आंबाडे व बिमलें ह्या आंबट फळांचीही उड्डमेथी बनवली जाते. तर माशाच्या पाककृतींमध्ये बांगड्याची उड्डमेथी अत्यंत रुचकर लागते. आज आपण बांगड्याची उड्डमेथी कशी करायची ते पाहूया. करायला सोपी आणि अत्यंत अधिक वाचा

आमलीची उड्डमेथी

आमलीची उड्डमेथी

आमली किंवा तोरा म्हणजे कैरी. गोवन स्वयंपाकघरात ह्या कैरीचा केवळ शाकाहारातच नाही तर माशांच्याही पदार्थात उपयोग केला जातो. ह्यातला अनेक जणांच्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उड्डमेथी. उडीद डाळ आणि मेथी घालून केलेली कैरीची उड्डमेथी अत्यंत चविष्ट लागतेच पण आंबाडे, बिंबला इतकेच नाही तर बांगड्याची उड्डमेथीही अप्रतिम चवीची असते. उड्डमेथी हा अधिक वाचा

error: Content is protected !!