मुगाचे सार

मुगाचे सार

महाराष्ट्रात जसा मटकीच्या उसळीबरोबर कट असतो. तसा गोव्यामध्ये मुगागाठींबरोबर सार केले जाते. फरक इतकाच की हे सार संपूर्ण सात्विक म्हणजे कांदालसणीशिवाय केले जाते. मुगागाठी, मुगाची उसळ, मुगाचे सार, खतखते हे सर्वच पदार्थ सणसमारंभ, धार्मिक कार्ये अशा वेळी बनवले जातात. त्यामुळे अधिक वाचा…

महागणपती मंदिर खांडोळा

महागणपती, खांडोळा

लहानापासून थोरांचे आवडते दैवत म्हणजे गणपती! गोव्यामध्ये गणपतीची अनेक देवळे असतील, पण त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते खांडोळा येथील महागणपती मंदिर. फोंडा तालुक्यातील माशेलहून सावईवेरेला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला मंदिराकडे जाणारी काहीशी उतरती वाट आहे. ह्या उतारावरून खाली येताच झाडांच्या अधिक वाचा…

गोव्यातील गणेशोत्सव

गणेशोत्सव: गोमंतकवासीयांचा सर्वात आवडता सण गणेश चतुर्थीचा सण हा महाराष्ट्राइतकाच गोव्यातही अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना गणेशोत्सव हा गोव्यातील लोकांचा सर्वात आवडता सण आहे. दसरा आणि दिवाळीपेक्षाही इथे गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. चवथ अर्थात गणेश चतुर्थीचे वेध लोकांना श्रावण अधिक वाचा…

हॉटेल महालसा, म्हार्दोळ

म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या समोरील रस्त्यावर, मंदिरातून बाहेर पडताच उजव्या बाजूला असणारे, हॉटेल महालसा. छोटेसेच हॉटेल, पण तिथे असणारी गर्दी त्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे वेगळेपण सांगून जाते. तिथे मिळणारे पदार्थ नॉर्मली गोव्यात इतर हॉटेलात मिळणारेच. पण अधिक वाचा…

तवसोळी गोवन पारंपरिक पदार्थ

तवसोळी

गोव्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते गणेश चतुर्थी पर्यंत मोठ्या आकाराची काकडी मिळते, तिला तवशे असे म्हणतात. पिवळसर हिरव्या रंगाची आणि फिक्या हिरव्या रंगाची असे तवशाचे दोन प्रकार असतात. ह्या काकडीपासून बनवलेला गोड पदार्थ म्हणजे तवसोळी. बेळगाव भागात अशा तवशाचा मिरची आणि अधिक वाचा…

देवकीकृष्ण मंदिर, माशेल

देवकीकृष्ण मंदिर, माशेल

देवकी आणि बाल कृष्णाचे एकमेव मंदिर गोव्यातील माशेल गाव म्हटलं की मला सगळ्यात प्रथम आठवते ते देवकीकृष्ण मंदिर. जन्मदात्री माता देवकीच्या मांडीवर बाळ श्रीकृष्ण, असे हे देवकी आणि कृष्णाचे भारतातील एकमेव मंदिर. देवकीकृष्ण मंदिराचे स्थापत्य गोव्यातील इतर मंदिरांसारखेच आहे. देवालय अधिक वाचा…

मंदोदरी देवस्थान

मंडोदरी मंदिर, बेतकी, गोवा

मंडोदरी नावाचे गूढ अनंत देवस्थानाचे दर्शन घेऊन परतत असताना वाटेत बेतकी येथे मंडोदरी देवस्थान असा बोर्ड वाचला. मंडोदरीचे एकमेव देवस्थान असाही तिथे उल्लेख केलेला होता.  मंदोदरीऐवजी मंडोदरी अशी चूक ह्या बोर्डवर कशी काय केली याची चर्चा करत आम्ही डावीकडचे वळण अधिक वाचा…

गोव्यातील पावसाळी भाज्या

गोव्यातील पावसाळी भाज्या आणि त्यांचे महत्व तसं पाहायला गेलं तर गोवेकरांचा मुख्य आहार मासे. परंतु गोवेकर शाकाहारी पदार्थही आवडीने खातो. पारंपरिक असोत वा मोसमी गोवन शाकाहारी पदार्थांची लिस्टही मोठी आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा येताच गोवेकरांना पावसाळी भाज्यांची ओढ लागते. ह्यातली अधिक वाचा…

पातोळ्या

काही पदार्थांची काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली आहे. प्रांतानुसार हे पदार्थ आणि सण यांच्या जोड्या वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे खास पदार्थ असतात. गोव्याचेही स्वतःचे काही खास पारंपरिक पदार्थ आहेत. त्यातल्या काही पदार्थांच्या विशिष्ट सणाशी जोड्या जमलेल्या अधिक वाचा…

Soyara's

सोयरा’ज(Soyara’s)

सोयरा’ज! पणजीतील पाटो येथील कदंब बस स्टॅन्ड जवळील व्हेज, नॉन-व्हेज रेस्टॉरंट. सोयरा’ज म्हणजे एका मराठमोळ्या स्त्रीच्या कष्टाची यशोगाथा. महाराष्ट्रातून पतीसोबत गोव्यात स्थायिक झालेल्या ह्या जिद्दी महिलेने आपण काहीतरी करायचंच हा ध्यास घेतला होता. त्या ध्यासातून स्वतःच्या आवडीची अशी विशेष हातखंडा असलेली पाककला अधिक वाचा…

error: Content is protected !!