खतखते, पारंपरिक गोवन पदार्थ

खतखते 

गोव्याचा आणखीन एक पारंपरिक पदार्थ, खतखते! जे गोव्याबरोबरच; महाराष्ट्र, कर्नाटकातील सारस्वत कुटुंबात गणेश चतुर्थीला आवर्जून केले जाते. गणपतीचा तो आवडता पदार्थ आहे अशीही एक धारणा आहे. श्रावण महिन्यात मिळणाऱ्या, तसेच काही बारमाही मिळणाऱ्या विविध भाज्या घालून केलेली ही भाजी म्हणजे अवीट गोडीचा खास पदार्थ आहे. ह्यात घातलेल्या प्रत्येक भाजीची चव अधिक वाचा…

महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ

महालसा नारायणी मंदिर, म्हार्दोळ

कुलदेवता महालसा नारायणी महालसा नारायणी, माझी कुलदेवता. माहेर आणि सासर दोन्ही कडून. लग्नापूर्वी गोव्याला येण्याचं मुख्य कारण असायचं कुलदेवतेचं दर्शन. ते झालं की मग बाकीचं थोडं फार गोवा दर्शन. पुढे महालसा मातेची कृपा अशी झाली की ती सासरहूनही कुलदेवता झाली. आणि सासर दिलं ते ही गोव्यात, तिच्यापासून अवघे पंचवीस कि.मी. अधिक वाचा…

ठाकरवाडी आदिवासी कलादालन

ठाकरवाडी आदिवासी कलादालन

सरसोली धामचे प्रसन्न दर्शन घेतल्यानंतर कुडाळमधून गोव्याच्या दिशेला जाताजाता वाटेतच ठाकरवाडी येथे श्री गणपत मसगे ह्यांनी स्थापन केलेले कलादालन असल्याचे कळले.  खरं तर केवळ वाटेत जाता जाता लागते  म्हणून आम्ही इथे आलो होतो. पण ह्या कलादालनाचे वेगळे पण; जुन्या नष्ट होत चाललेल्या लोक कला, पारंपरिक वस्तू आणि दुरावलेली संस्कृती यांची ओळख अधिक वाचा…

सरसोली धाम, कुडाळ

सरसोली धाम, कुडाळ

काही महिन्यापूर्वी  वेंगुर्ला, मालवण, कुडाळ येथे तीन चार दिवसाच्या प्रवासाला आम्ही गेलो होतो. वेंगुर्ला आणि मालवण पाहिल्यानंतर गोव्याला परतताना आम्ही कुडाळ पाहायला गेलो. पहिल्या दिवशी.पिंगुळीचा श्री राऊळ महाराज मठ पाहिल्यानंतर दुसऱ्यादिवशी सर्व प्रथम सरसोली धाम हा सिंधी समाजाचा मठ पाहायचे असे आम्ही ठरविले. तिथे जाताना वाटेत आम्हाला, भारतातले पहिले साई अधिक वाचा…

राऊळ महाराज मठ , पिंगुळी कुडाळ

श्री राऊळ महाराज मठ, पिंगुळी, कुडाळ

मालवणचे रम्य दर्शन घेऊन आम्ही कुडाळच्या दिशेने निघालो. वाटेत भराडी देवीचे दर्शन घेऊन साधारण चारच्या दरम्यान आम्ही कुडाळ गाठले. शहरांमध्ये शिरता शिरताच सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेचा फलक लक्ष वेधून घेत होता. कुडाळ म्हणताच पहिल्यांदा ध्यानात येते ते पिंगुळी. पिंगुळी मध्ये भेट देण्यासारखी दोन स्थाने आहेत. एक तर श्री राऊळ अधिक वाचा…

Recheado Bangado

रशेद बांगडा (Recheado Bangado)

आपल्या विशेष चवीने बांगडा अनेक लोकांचा आवडता बनलेला आहे. गोव्यामध्ये तर ह्या बांगड्याचे अनेक प्रकार केले जातात. जसे बांगड्याचे सुके, बांगड्याचे आमट तीख, बांगड्याचे हुमण (fish curry) इत्यादी. इतकेच नाही तर बांगड्याचे लोणचे सुद्धा केले जाते. त्यातील आपल्या विशेष चवीने सर्वप्रिय असलेला असा बांगड्याचा एक प्रकार म्हणजे रशेद बांगडा (Recheado अधिक वाचा…

Recheado Masala

रशेद मसाला (Recheado masala)

रशेद मसाला (Recheado masala) हा गोवन मसाल्याचा एक प्रकार आहे. रशेदो ह्या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे stuffed. भरलेल्या माशासाठी  ह्या मसाल्याचा वापर विशेषतः केला जातो. माशांबरोबरच चिकन, पनीर आणि भाज्यांमध्येही ह्या मसाल्याचा वापर करता येतो. परंतु ह्या मसाल्याची जोडी परंपरेने माशाबरोबर आणि ती ही बांगड्याबरोबर छान जमते. रशेद बांगडा हा अधिक वाचा…

लक्ष्मी नरसिंह मंदिर, वेलिंग

लक्ष्मी नरसिंह मंदिर, वेलिंग

गोव्यातील एक पवित्र स्थान लक्ष्मी नरसिंह मंदिर! वेलिंगच्या ह्या मंदिरात प्रवेश केला आणि मी मंत्रमुग्ध झाले.. अत्यंत पवित्र, शांत, प्रसन्न वातावरण! देवळाचा परिसर अतिशय सुंदर, निसर्गाने नटलेला… सुंदर देवालय, डाव्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीसह नरसिंहाची काहीशी उग्र परंतु तितकीच आकर्षक मूर्ती आणि सभोवतालचा निसर्ग अशा तीन रूपांमध्ये देव इथे आपल्याला दर्शन अधिक वाचा…

मुगाची उसळ

मुगाची उसळ

मुगाची उसळ हा गोवन शाकाहारी जेवणातील आणखी एक पारंपरिक पदार्थ. पण हे मूग मात्र मोड काढलेले हवेत. मोड आलेले मूग हे गोवन शाकाहारी जेवणात इतर कडधान्यांच्या तुलनेत जास्त महत्वाचे आहेत. मुगाची उसळ, मुगागाठी, मुगाचे सार असे विविध पदार्थ मोड आलेल्या मुगांपासून बनवले जातात. मोड आलेल्या मुगाची ही सुकी उसळ विशेष अधिक वाचा…

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिर, फातर्पे

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण

समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान! शांतादुर्गा देवी म्हणजे समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान! संपूर्ण गोव्यामध्ये अनेक गावांमधून त्या त्या गावाच्या नावाने शांतादुर्गा देवीची मंदिरे आहेत. असंच एक अत्यंत प्रसिद्ध मंदिर जे लाखो भाविकांचं अतुल्य श्रद्धास्थान आहे ते म्हणजे फातर्प्याचे शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचे मंदिर. आता गावाचे नाव तर फातर्पा आणि देवी कुंकळ्ळीकरीण कशी असा प्रश्न अधिक वाचा…