अनसाचे सासव

अनसाचे सासव

“अनसाचे सासव” अर्थात अननसाचा आंबट गोड गोवन पदार्थ! सासव हा एक पारंपरिक गोमंतकीय पदार्थ आहे. ह्या पदार्थामधील एक टाळता न येणारा घटक म्हणजे मोहरी, ज्याला कोकणी भाषेत सासवा म्हणतात. घोटा अर्थात रायवळ आंबे घालून केलेले घोटाचे सासव हे जास्तीजास्त लोकांचे अधिक आवडते असले; तरी अननस वर्षभर मिळत असल्याने आंब्याचा मोसम अधिक वाचा

बिमलाचो रोस

बिमलाचो रोस

आंबट तिखट बिमलाचो रोस म्हणजे बिमल ह्या फळापासून बनवलेली आमटी. खोबऱ्याच्या वाटणातील ही आमटी खास चवीची असते. बिमल हे एक आंबट फळ आहे जे दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. बिंबल किंवा बिलिंबी म्हणूनही ओळखले जाणारे हे फळ विशेषतः गोवा, महाराष्ट्र, केरळ आदि राज्यांमध्ये पाहायला मिळते. बिमलाच्या  झाडाला उष्ण, दमट हवामान अधिक वाचा

राऊळ महाराज मठ , पिंगुळी कुडाळ

श्री राऊळ महाराज मठ

मालवणचे रम्य दर्शन घेतल्यानंतर वाटेत भराडी देवीचे दर्शन घेऊन आम्ही कुडाळ गाठले. शहरांमध्ये शिरता शिरताच सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेचा फलक लक्ष वेधून घेत होता. कुडाळ म्हणताच पहिल्यांदा ध्यानात येते ते पिंगुळी! पिंगुळी मध्ये भेट देण्यासारखी दोन स्थाने आहेत; एक श्री राऊळ महाराज मठ, आणि दुसरे ठाकरवाडी आदिवासी कलादालन!   अधिक वाचा

सेर्रादुर्रा

सेर्रादुरा

“सेर्रादुरा” हा एक पोर्तुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे, “लाकडाचा भुसा”. मारी बिस्कीटची पावडर, जी अगदी लाकडाच्या भुशासारखी दिसते तिचा वापर करून केलेल्या ह्या गोड पदार्थाला म्हणूनूच सेर्रादुरा हे नाव पडले. सॉ डस्ट पुडिंग म्हणूनही ओळखले जाणारे हे एक पोर्तुगीज पुडिंग आहे. जे पोर्तुगाल इतकेच गोव्यामध्येही प्रसिद्ध आहे. विविध गोवन अधिक वाचा

एन् व्ही इको फार्म

एन् व्ही इको फार्म!

दक्षिण गोव्यामधील धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल दाभाळ येथील निसर्ग (nature) आणि साहस (adventure) यांचं एक अनोखं मिश्रण असलेले इको फार्म, एन् व्ही इको फार्म!  सुट्टीचे क्षण आनंदात घालवण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे. आधुनिक कृषी विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड देऊन उभे केलेले हे इको फार्म गोव्याच्या मध्यभागी वसलेले आहे.  एकूण ६० अधिक वाचा

रेईश मागुश फोर्ट

बार्देश तालुक्यातील सुंदर किल्ला, रेईश मागुश! पणजी बस स्टॅन्ड पासून साधारण ७-८ कि.मी.वर असणारा हा किल्ला विशेष मोठा नाही परंतु त्याची आकर्षक रचना अतिशय लोभसवाणी आहे. किल्ल्यावरून दिसणारे मांडवी नदीचे व सभोवतालचे सृष्टी सौंदर्यही डोळ्यात भरून घेण्यासारखे आहे. किल्ला खूप उंच नाही त्यामुळे वर चढून जाण्यासाठी भरपूर पायऱ्या नसल्या तरी अधिक वाचा

आकूरची भाजी

आकूरची पातळ भाजी

आकूर ही गोव्यामध्ये पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. तांबूस हिरव्या रंगाची ही भाजी कोवळ्या अंकुर स्वरूपातच बाजारात येते. पावसाळ्यात नदी काठी आकूर ह्या भाजीचे कोंब उगवतात. चणा डाळ, हिरवे वाटाणे, मसूर अशा वेगवेगळ्या कडधान्यांबरोबर आकूरची अत्यंत चविष्ट अशी पातळ भाजी केली जाते. फक्त खोबऱ्याचे वाटण घालून केलेली ह्या आकूरची भाजी सुद्धा अधिक वाचा

मखरोत्सव

नवरात्र हा उत्सव भारताच्या विविध भागात विविध तऱ्हेने साजरा केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा, गुजराथमध्ये गरबा हे तर प्रसिद्ध आहेच. पण गोव्यामध्ये नवरात्र कशी साजरी करतात आपल्याला माहित आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अशा मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मखरोत्सव हा गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये आणि विशेष करून फोंड्यातील सर्व मंदिरामध्ये अधिक वाचा

बोडगेश्वर मंदिर

बोडगेश्वर मंदिर, म्हापसा

म्हापसेकरांचा राखणदार: श्री बोडगेश्वर उत्तर गोव्यातील अत्यंत गजबजलेल्या म्हापसा शहराची राखणदार देवता, जी स्थानिक लोकांच्या मनामध्ये एक श्रद्धापूर्ण स्थान राखून आहे ती म्हणजे देव बोडगेश्वर. म्हापशातील भक्तांचा असा दृढ विश्वास आहे की देव बोडगेश्वर म्हापसा शहराचे संरक्षण करतो आणि येथील लोकांवर सदैव लक्ष ठेवून असतो. पिढ्यानपिढ्या हा विश्वास आणखीनच दृढ अधिक वाचा

मुगाचे सार

मुगाचे सार

महाराष्ट्रात जसा मटकीच्या उसळीबरोबर कट असतो. तसा गोव्यामध्ये मुगागाठींबरोबर सार केले जाते. फरक इतकाच की हे सार संपूर्ण सात्विक म्हणजे कांदालसणीशिवाय केले जाते. मुगागाठी, मुगाची उसळ, मुगाचे सार, खतखते हे सर्वच पदार्थ सणसमारंभ, धार्मिक कार्ये अशा वेळी बनवले जातात. त्यामुळे हे सर्व पदार्थ सात्विक असतात. मुगागाठी करताना, मूग शिजल्यावर वरचे अधिक वाचा

error: Content is protected !!