Kamaleshwar Temple

कमळेश्वर मंदिर, ढवळी-गोवा

हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात लपलेले कमळेश्वर मंदिर गोमंतक भूमी ही मंदिरांची भूमी. छोटी आणि मोठी अशी हजारो मंदिरे येथे आहेत. अशाच एका दाट निसर्गामध्ये लपलेल्या मंदिराबद्दल हल्लीच कळले होते. तेव्हाच हे मंदिर पाहायला जाण्याचा निश्चय केला होता. फोंड्यातील ढवळी येथे, वरची ढवळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागामध्ये, डोंगराच्या छोटाशा कपारीत लपलेले हे अधिक वाचा…

Brahmadev Mandir, Brahmakaramali

ब्रह्मदेव मंदिर, ब्रह्मकरमळी

ब्रह्मा विष्णू महेश हिंदू धर्मियांचे तीन मुख्य देव! परंतु या त्रिदेवांमधील सृष्टिकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मदेवाची मंदिरे संपूर्ण भारतात अगदी हाताच्या बोटावर मोजावी इतकीच आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध मंदिर राजस्थानातील अजमेरजवळ पुष्कर येथे आहे. प्राचीन असे आणखीन एक दुर्मिळ  ब्रह्मदेव मंदिर; गोव्यातील वनराईने वेढलेल्या, डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या करमळी ह्या गावात अधिक वाचा…

Mahalasa Temple Verna

महालसा मंदिर, वेर्णा

सहा वर्षांनंतर वेर्ण्यातील महालसा मंदिराला पुन्हा भेट एका लग्नाच्या निमित्ताने पाच-सहा वर्षानंतर वेर्ण्याच्या महालसा मंदिराला भेट देण्याचा योग आला. सहा वर्षांपूर्वी पाहिले त्याहून महालसा मंदिरआणि मंदिर परिसर अधिक सुंदर दिसत होते. मंदिराच्या आवारातील महालसा नारायणी विद्यालयही आता बांधून पूर्ण झालेले आहे. मंदिराच्या वास्तूला साजेशी ह्या विद्यामंदिराची इमारत संपूर्ण मंदिर प्रांगणाच्या अधिक वाचा…

बोडगेश्वर मंदिर

बोडगेश्वर मंदिर, म्हापसा

म्हापसेकरांचा राखणदार समस्त म्हापसेकरांचा राखणदार आणि अनेक गोवेकरांचे श्रद्धास्थान, देव बोडगेश्वर! पणजी पासून साधारण १२ कि. मी वर म्हापशाच्या प्रवेशापाशीच असलेल्या बोडगिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर बोडगेश्वराचे मंदिर आहे. पुर्वी ही जागा पाणथळ दलदलीची अशी होती. त्यामुळे इथे केवड्याची भरपूर झाडे होती. लोकल भाषेत केवड्याला बोडगी असे म्हणतात त्यामुळे हा भाग अधिक वाचा…

महागणपती मंदिर खांडोळा

महागणपती, खांडोळा

लहानापासून थोरांचे आवडते दैवत म्हणजे गणपती! गोव्यामध्ये गणपतीची अनेक देवळे असतील, पण त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते खांडोळा येथील महागणपती मंदिर. फोंडा तालुक्यातील माशेलहून सावईवेरेला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला मंदिराकडे जाणारी काहीशी उतरती वाट आहे. ह्या उतारावरून खाली येताच झाडांच्या सावलीत विसावलेले प्रांगण मनाला आधीच प्रसन्न करून जाते. सभामंडप प्रांगणातून अधिक वाचा…

देवकीकृष्ण मंदिर, माशेल

देवकीकृष्ण मंदिर, माशेल

देवकी आणि बाल कृष्णाचे एकमेव मंदिर गोव्यातील माशेल गाव म्हटलं की मला सगळ्यात प्रथम आठवते ते देवकीकृष्ण मंदिर. जन्मदात्री माता देवकीच्या मांडीवर बाळ श्रीकृष्ण, असे हे देवकी आणि कृष्णाचे भारतातील एकमेव मंदिर. देवकीकृष्ण मंदिराचे स्थापत्य गोव्यातील इतर मंदिरांसारखेच आहे. देवालय आणि देवालयाचा परिसर अत्यंत प्रेक्षणीय आहे. गोव्यातील प्रत्येक मंदिराचे स्वरूप अधिक वाचा…

मंदोदरी देवस्थान

मंडोदरी मंदिर, बेतकी, गोवा

मंडोदरी नावाचे गूढ अनंत देवस्थानाचे दर्शन घेऊन परतत असताना वाटेत बेतकी येथे मंडोदरी देवस्थान असा बोर्ड वाचला. मंडोदरीचे एकमेव देवस्थान असाही तिथे उल्लेख केलेला होता.  मंदोदरीऐवजी मंडोदरी अशी चूक ह्या बोर्डवर कशी काय केली याची चर्चा करत आम्ही डावीकडचे वळण घेत  हे देवस्थान पाहण्यासाठी निघालो. अरुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या नारळी अधिक वाचा…

अनंत देवस्थान, सावई-वेरे

अनंत देवस्थान – शेषशायी विष्णूचे अद्वितीय मंदिर गोव्याच्या फोंडा तालुक्यातील सावई आणि वेरे ही दोन गावे आपल्याला एका अद्वितीय आध्यात्मिक अनुभवाची वाट दाखवतात – आणि या वाटेचा शेवट होतो एका अप्रतिम, शांततामय आणि सौंदर्यपूर्ण मंदिरात – अनंत देवस्थान! अनंत देवस्थान म्हणजे अनंतशयन विष्णूचे अप्रतिम सुंदर मंदिर.   सावई गाव संपताच सुरू अधिक वाचा…

तांबडी सुर्ल : निसर्गाच्या कोंदणातील हिरा

तुम्ही नियमित गोव्यामध्ये येता आणि अजूनपर्यंत तुम्ही तांबडी सुर्ल पाहिले नसेल तर तुम्ही अत्यंत दुर्दैवी आहात. मुळातच गोवा म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा खजिना आणि तांबडी सुर्ल म्हणजे ह्या निसर्गाच्या कोंदणात बसवलेला हिराच जणू. पावसाळ्यात ह्या ठिकाणी भेट देऊन डोळे भर हे निसर्ग सौंदर्य पाहावे. किंवा इतर कुठल्याही मोसमात ह्या ठिकाणी अधिक वाचा…

देवी लईराई मंदिर शिरगांव गोवा

लईराई देवी, शिरगाव

लईराई : उत्सुकता आणि दर्शनाची ओढ लईराई हे नाव गोव्यात आल्यानंतर अनेकदा कानावर पडत होतं. कोण असेल ही देवी? काय असेल देवीची कथा? असे प्रश्न मनात निर्माण करत होतं. विशेषतः लईराई देवीची जत्रा जवळ आली की वर्तमानपत्रात येणारी मोठी जाहिरात लक्ष वेधून घेत होती, ती लईराई देवीच्या त्यातील चित्रामुळे. इतर अधिक वाचा…

error: Content is protected !!