अनसाचे सासव

अनसाचे सासव

“अनसाचे सासव” अर्थात अननसाचा आंबट गोड गोवन पदार्थ! सासव हा एक पारंपरिक गोवन पदार्थ आहे. ह्या पदार्थामधील एक टाळता न येणारा घटक म्हणजे मोहरी, ज्याला कोकणी भाषेत सासवा म्हणतात. घोटा अर्थात रायवळ आंबे घालून केलेले घोटाचे सासव हे जास्तीजास्त लोकांचे अधिक वाचा…

बिमलाचो रोस

बिमलाचो रोस

आंबट तिखट बिमलाचो रोस म्हणजे बिमल ह्या फळापासून बनवलेली आमटी. खोबऱ्याच्या वाटणातील ही आमटी खास चवीची असते. बिमल हे एक आंबट फळ आहे जे दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. बिंबल किंवा बिलिंबी म्हणूनही ओळखले जाणारे हे फळ विशेषतः गोवा, महाराष्ट्र, अधिक वाचा…

राऊळ महाराज मठ , पिंगुळी कुडाळ

श्री राऊळ महाराज मठ

मालवणचे रम्य दर्शन घेतल्यानंतर वाटेत भराडी देवीचे दर्शन घेऊन आम्ही कुडाळ गाठले. शहरांमध्ये शिरता शिरताच सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेचा फलक लक्ष वेधून घेत होता. कुडाळ म्हणताच पहिल्यांदा ध्यानात येते ते पिंगुळी! पिंगुळी मध्ये भेट देण्यासारखी दोन स्थाने आहेत; एक अधिक वाचा…

शिगमोत्सव

शिगमोत्सव – २०२५

फाल्गुन महिना येतो तसा गोव्याला वेध लागतात शिगमोत्सवाचे! सगळे लोक आतुरतेने ह्या शिगमोत्सव (शिमगा) अर्थात होळी सणाची वाट पाहत असतात. आपापल्या भागात कुठल्या तारखेला शिगमोत्सव मिरवणूक आणि चित्ररथ असणार याची लोकांमध्ये उत्सुकतेने चर्चा सुरु होते. ह्यावर्षीचा होळी सण अवघा चार अधिक वाचा…

सेर्रादुर्रा

सेर्रादुर्रा

“सेर्रादुर्रा” हा एक पोर्तुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे, “लाकडाचा भुसा”. मारी बिस्कीटची पावडर, जी अगदी लाकडाच्या भुशासारखी दिसते तिचा वापर करून केलेल्या ह्या गोड पदार्थाला म्हणूनूच सेर्रादुर्रा हे नाव पडले. सॉ डस्ट पुडिंग म्हणूनही ओळखले जाणारे हे एक पोर्तुगीज अधिक वाचा…

एन् व्ही इको फार्म

एन् व्ही इको फार्म!

दक्षिण गोव्यामधील धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल दाभाळ येथील निसर्ग (nature) आणि साहस (adventure) यांचं एक अनोखं मिश्रण असलेले इको फार्म, एन् व्ही इको फार्म!  सुट्टीचे क्षण आनंदात घालवण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे. आधुनिक कृषी विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड देऊन उभे अधिक वाचा…

रेईश मागुश फोर्ट

बार्देश तालुक्यातील सुंदर किल्ला, रेईश मागुश! पणजी बस स्टॅन्ड पासून साधारण ७-८ कि.मी.वर असणारा हा किल्ला विशेष मोठा नाही परंतु त्याची आकर्षक रचना अतिशय लोभसवाणी आहे. किल्ल्यावरून दिसणारे मांडवी नदीचे व सभोवतालचे सृष्टी सौंदर्यही डोळ्यात भरून घेण्यासारखे आहे. किल्ला खूप अधिक वाचा…

आकूरची भाजी

आकूरची पातळ भाजी

आकूर ही गोव्यामध्ये पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. तांबूस हिरव्या रंगाची ही भाजी कोवळ्या अंकुर स्वरूपातच बाजारात येते. पावसाळ्यात नदी काठी आकूर ह्या भाजीचे कोंब उगवतात. चणा डाळ, हिरवे वाटाणे, मसूर अशा वेगवेगळ्या कडधान्यांबरोबर आकूरची अत्यंत चविष्ट अशी पातळ भाजी केली अधिक वाचा…

मखरोत्सव

नवरात्र हा उत्सव भारताच्या विविध भागात विविध तऱ्हेने साजरा केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा, गुजराथमध्ये गरबा हे तर प्रसिद्ध आहेच. पण गोव्यामध्ये नवरात्र कशी साजरी करतात आपल्याला माहित आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अशा मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मखरोत्सव अधिक वाचा…

बोडगेश्वर मंदिर

बोडगेश्वर मंदिर, म्हापसा

म्हापसेकरांचा राखणदार समस्त म्हापसेकरांचा राखणदार आणि अनेक गोवेकरांचे श्रद्धास्थान, देव बोडगेश्वर! पणजी पासून साधारण १२ कि. मी वर म्हापशाच्या प्रवेशापाशीच असलेल्या बोडगिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर बोडगेश्वराचे मंदिर आहे. पुर्वी ही जागा पाणथळ दलदलीची अशी होती. त्यामुळे इथे केवड्याची भरपूर झाडे अधिक वाचा…

error: Content is protected !!