गोव्यातील पावसाळी भाज्या

तसं पाहायला गेलं तर गोवेकरांचा मुख्य आहार मासे. परंतु गोवेकर शाकाहारी पदार्थही आवडीने खातो. पारंपरिक असोत वा मोसमी गोवन शाकाहारी पदार्थांची लिस्टही मोठी आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा येताच गोवेकरांना पावसाळी भाज्यांची ओढ लागते. ह्यातली प्रत्येक भाजी कमीत कमी एकदा तरी खाल्लीच पाहिजे असे त्यांचे म्हणणे असते. परंतु खाण्याच्या सवयी बदललेली अधिक वाचा…

पातोळ्या

काही पदार्थांची काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली आहे. प्रांतानुसार हे पदार्थ आणि सण यांच्या जोड्या वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे खास पदार्थ असतात. गोव्याचेही स्वतःचे काही खास पारंपरिक पदार्थ आहेत. त्यातल्या काही पदार्थांच्या विशिष्ट सणाशी जोड्या जमलेल्या आहेत. जसे; नागपंचमी आणि पातोळ्या, चवथ अर्थात गणेशचतुर्थी आणि नेवऱ्या अधिक वाचा…

Soyara's

सोयरा’ज(Soyara’s)

सोयरा’ज! पणजीतील पाटो येथील कदंब बस स्टॅन्ड जवळील व्हेज, नॉन-व्हेज रेस्टॉरंट. सोयरा’ज म्हणजे एका मराठमोळ्या स्त्रीच्या कष्टाची यशोगाथा. महाराष्ट्रातून पतीसोबत गोव्यात स्थायिक झालेल्या ह्या जिद्दी महिलेने आपण काहीतरी करायचंच हा ध्यास घेतला होता. त्या ध्यासातून स्वतःच्या आवडीची अशी विशेष हातखंडा असलेली पाककला मदतीला आली आणि सुरुवात झाली सोयरा’जची.  पणजी शहर हे अधिकाधिक अधिक वाचा…

अनंत देवस्थान, सावई-वेरे

अनंत देवस्थान म्हणजे अनंतशयन विष्णूचे अप्रतिम सुंदर मंदिर. फोंडा तालुक्यामध्ये असणारी दोन छोटी गावे, सावई आणि वेरे. सावई गाव संपताच वेरे गावामध्ये असणारे हे मंदिर सावईवेरे येथील मदनंत मंदिर म्हणूनही  प्रसिद्ध आहे. पणजीहुन साधारण 24-25 कि. मी. दूर असलेल्या मंदिराला माशेल खांडोळा मार्गे जायचे आहे. माशेल येथील देवकी कृष्ण आणि अधिक वाचा…

तांबडी सुर्ल

तुम्ही नियमित गोव्यामध्ये येता आणि अजूनपर्यंत तुम्ही तांबडी सुर्ल पाहिले नसेल तर तुम्ही अत्यंत दुर्दैवी आहात. मुळातच गोवा म्हणजे अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा खजिना आणि तांबडी सुर्ल म्हणजे ह्या निसर्गाच्या कोंदणात बसवलेला हिराच जणू. पावसाळ्यात ह्या ठिकाणी भेट देऊन डोळे भर हे निसर्ग सौंदर्य पाहावे. किंवा इतर कुठल्याही मोसमात ह्या ठिकाणी अधिक वाचा…

Ghotache Saansav

घोटांचे सांसव

घोटां म्हणजे गावठी आंबा. जो साले काढून चोखून खाल्ला जातो. आंबट गोड चवीच्या ह्या आंब्याचा गोव्यामध्ये बनविला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे घोटांचे सांसव. कोंकणी भाषेत सांसवा म्हणजे मोहरी (mustard seeds). हिंग मोहरीची फोडणी देऊन केलेल्या ह्या पदार्थामध्ये, खोबऱ्याच्या वाटपामध्येही मोहरीचे दाणे घातले जातात. अशाप्रकारे मोहरीची  किंचित कडू, आंब्याची आंबट गोड अधिक वाचा…

देवी लईराई, शिरगांव

लईराई देवीची कथा

कोण आहे लईराई देवी? गोव्यातील अनेक देवतांपैकी एक देवी लईराई. तिचा भक्तगणही मोठा! गोव्यातल्या बहुसंख्य लोकांना जरी लईराई देवीबद्दल माहित असले तरी, कामानिमित्त गोव्यात येऊन राहिलेल्यांना तसेच गोव्यातील मंदिरे पाहण्याची उत्सुकता असलेल्या पर्यटकांना मात्र कोण ही लईराई देवी? असा प्रश्न पडतो. लईराई देवीची कथा अतिशय अद्भुत आहे. लईराई देवी आणि अधिक वाचा…

बांगड्याचे हुमण (Mackerel fish curry)

बांगड्याचे हुमण (Mackerel fish curry)

हुमण म्हणजे fish curry  हा गोवन जेवणाचा अविभाज्य भाग! त्यात जर हुमण बांगड्याचे असेल तर काय विचारता!! माशाच्या जेवणात बांगडा आणि बांगड्याच्या करीवर प्रेम असलेले लोक अधिक! गोव्यामध्ये हुमण (fish curry) करायची पद्धत मासा कुठला आहे त्याच्यावर ठरते. पारंपरिक पद्धतीने केलेले माशाचे हुमण हे कांद्याचे आणि बिन कांद्याचे असे दोन अधिक वाचा…

Verliche Suke

वेर्लीचे सुके

गोव्यामध्ये असंख्य प्रकारचे मासे मिळतात. प्रत्येकाची चव अनोखी! छोट्या माशांमध्ये जे अनेक प्रकार मिळतात त्यातला एक प्रकार म्हणजे वेर्ली (कोंकणी उच्चार वेल्ली). चंदेरी रंगाच्या ह्या छोट्या रुचकर माशाचे जे विविध प्रकार गोव्यामध्ये बनवले जातात, त्यातीलच एक प्रकार म्हणजे वेर्लीचे सुके. वेर्लीचे सुके बनवायची पद्धत अत्यंत सोपी. आणि हा पदार्थ करायला अधिक वाचा…

देवी लईराई मंदिर शिरगांव गोवा

लईराई देवी, शिरगांव

लईराई हे नाव गोव्यात आल्यानंतर अनेकदा कानावर पडत होतं. कोण असेल ही देवी? काय असेल देवीची कथा? असे प्रश्न मनात निर्माण करत होतं. विशेषतः लईराई देवीची जत्रा जवळ आली की वर्तमानपत्रात येणारी मोठी जाहिरात लक्ष वेधून घेत होती, ती लईराई देवीच्या त्यातील चित्रामुळे. इतर देवतांचे रूप आणि लईराई देवीचे हे अधिक वाचा…