आकूरची भाजी

आकूरची पातळ भाजी

आकूर ही गोव्यामध्ये पावसाळ्यात मिळणारी भाजी आहे. तांबूस हिरव्या रंगाची ही भाजी कोवळ्या अंकुर स्वरूपातच बाजारात येते. पावसाळ्यात नदी काठी आकूर ह्या भाजीचे कोंब उगवतात. चणा डाळ, हिरवे वाटाणे, मसूर अशा वेगवेगळ्या कडधान्यांबरोबर आकूरची अत्यंत चविष्ट अशी पातळ भाजी केली जाते. फक्त खोबऱ्याचे वाटण घालून केलेली ह्या आकूरची भाजी सुद्धा अधिक वाचा…

मखरोत्सव

नवरात्र हा उत्सव भारताच्या विविध भागात विविध तऱ्हेने साजरा केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा, गुजराथमध्ये गरबा हे तर प्रसिद्ध आहेच. पण गोव्यामध्ये नवरात्र कशी साजरी करतात आपल्याला माहित आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अशा मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मखरोत्सव हा गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये आणि विशेष करून फोंड्यातील सर्व मंदिरामध्ये अधिक वाचा…

बोडगेश्वर मंदिर

बोडगेश्वर मंदिर, म्हापसा

म्हापसेकरांचा राखणदार समस्त म्हापसेकरांचा राखणदार आणि अनेक गोवेकरांचे श्रद्धास्थान, देव बोडगेश्वर! पणजी पासून साधारण १२ कि. मी वर म्हापशाच्या प्रवेशापाशीच असलेल्या बोडगिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर बोडगेश्वराचे मंदिर आहे. पुर्वी ही जागा पाणथळ दलदलीची अशी होती. त्यामुळे इथे केवड्याची भरपूर झाडे होती. लोकल भाषेत केवड्याला बोडगी असे म्हणतात त्यामुळे हा भाग अधिक वाचा…

मुगाचे सार

मुगाचे सार

महाराष्ट्रात जसा मटकीच्या उसळीबरोबर कट असतो. तसा गोव्यामध्ये मुगागाठींबरोबर सार केले जाते. फरक इतकाच की हे सार संपूर्ण सात्विक म्हणजे कांदालसणीशिवाय केले जाते. मुगागाठी, मुगाची उसळ, मुगाचे सार, खतखते हे सर्वच पदार्थ सणसमारंभ, धार्मिक कार्ये अशा वेळी बनवले जातात. त्यामुळे हे सर्व पदार्थ सात्विक असतात. मुगागाठी करताना, मूग शिजल्यावर वरचे अधिक वाचा…

महागणपती मंदिर खांडोळा

महागणपती, खांडोळा

लहानापासून थोरांचे आवडते दैवत म्हणजे गणपती! गोव्यामध्ये गणपतीची अनेक देवळे असतील, पण त्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आहे ते खांडोळा येथील महागणपती मंदिर. फोंडा तालुक्यातील माशेलहून सावईवेरेला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला मंदिराकडे जाणारी काहीशी उतरती वाट आहे. ह्या उतारावरून खाली येताच झाडांच्या सावलीत विसावलेले प्रांगण मनाला आधीच प्रसन्न करून जाते. सभामंडप प्रांगणातून अधिक वाचा…

गोव्यातील गणेश उत्सव

गोव्यातील गणेशोत्सव

गणेश चतुर्थीचा सण हा महाराष्ट्राइतकाच गोव्यातही अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना गणेशोत्सव हा गोव्यातील लोकांचा सर्वात आवडता सण आहे. दसरा आणि दिवाळीपेक्षाही इथे गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. चवथ अर्थात गणेश चतुर्थीचे वेध लोकांना श्रावण सुरु होताच लागलेले असतात. पक्का मासेखाऊ असलेल्या गोवेकरांपैकी सगळेच नसले तरी बरेचजण, श्रावण अत्यंत श्रद्धेने अधिक वाचा…

हॉटेल महालसा, म्हार्दोळ

म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या समोरील रस्त्यावर, मंदिरातून बाहेर पडताच उजव्या बाजूला असणारे, हॉटेल महालसा. छोटेसेच हॉटेल, पण तिथे असणारी गर्दी त्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे वेगळेपण सांगून जाते. तिथे मिळणारे पदार्थ नॉर्मली गोव्यात इतर हॉटेलात मिळणारेच. पण ह्या पदार्थांना असलेली त्या हॉटेलच्या कूक सौ. सुपर्ता राजू नाईक अधिक वाचा…

तवसोळी गोवन पारंपरिक पदार्थ

तवसोळी

गोव्यामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून ते गणेश चतुर्थी पर्यंत मोठ्या आकाराची काकडी मिळते, तिला तवशे असे म्हणतात. पिवळसर हिरव्या रंगाची आणि फिक्या हिरव्या रंगाची असे तवशाचे दोन प्रकार असतात. ह्या काकडीपासून बनवलेला गोड पदार्थ म्हणजे तवसोळी. बेळगाव भागात अशा तवशाचा मिरची आणि तांदळाचे पीठ घालून थालीपीठाप्रमाणे पदार्थ केला जातो. त्याला तवसोळी म्हणतात. अधिक वाचा…

देवकीकृष्ण मंदिर, माशेल

देवकीकृष्ण मंदिर, माशेल

देवकी आणि बाल कृष्णाचे एकमेव मंदिर गोव्यातील माशेल गाव म्हटलं की मला सगळ्यात प्रथम आठवते ते देवकीकृष्ण मंदिर. जन्मदात्री माता देवकीच्या मांडीवर बाळ श्रीकृष्ण, असे हे देवकी आणि कृष्णाचे भारतातील एकमेव मंदिर. देवकीकृष्ण मंदिराचे स्थापत्य गोव्यातील इतर मंदिरांसारखेच आहे. देवालय आणि देवालयाचा परिसर अत्यंत प्रेक्षणीय आहे. गोव्यातील प्रत्येक मंदिराचे स्वरूप अधिक वाचा…

मंदोदरी देवस्थान

मंडोदरी मंदिर, बेतकी, गोवा

अनंत देवस्थानाचे दर्शन घेऊन परतत असताना वाटेत बेतकी येथे मंडोदरी देवस्थान असा बोर्ड वाचला. मंडोदरीचे एकमेव देवस्थान असाही तिथे उल्लेख केलेला होता.  मंदोदरीऐवजी मंडोदरी अशी चूक ह्या बोर्डवर कशी काय केली याची चर्चा करत आम्ही डावीकडचे वळण घेत  हे देवस्थान पाहण्यासाठी निघालो. अरुंद असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या नारळी पोफळीच्या बागा पहात अधिक वाचा…