मखरोत्सव

नवरात्र हा उत्सव भारताच्या विविध भागात विविध तऱ्हेने साजरा केला जातो. पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूजा, गुजराथमध्ये गरबा हे तर प्रसिद्ध आहेच. पण गोव्यामध्ये नवरात्र कशी साजरी करतात आपल्याला माहित आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अशा मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. मखरोत्सव हा गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये आणि विशेष करून फोंड्यातील सर्व मंदिरामध्ये अधिक वाचा…

गोव्यातील गणेश उत्सव

गोव्यातील गणेशोत्सव

गणेश चतुर्थीचा सण हा महाराष्ट्राइतकाच गोव्यातही अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना गणेशोत्सव हा गोव्यातील लोकांचा सर्वात आवडता सण आहे. दसरा आणि दिवाळीपेक्षाही इथे गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. चवथ अर्थात गणेश चतुर्थीचे वेध लोकांना श्रावण सुरु होताच लागलेले असतात. पक्का मासेखाऊ असलेल्या गोवेकरांपैकी सगळेच नसले तरी बरेचजण, श्रावण अत्यंत श्रद्धेने अधिक वाचा…

गोव्यातील पावसाळी भाज्या

तसं पाहायला गेलं तर गोवेकरांचा मुख्य आहार मासे. परंतु गोवेकर शाकाहारी पदार्थही आवडीने खातो. पारंपरिक असोत वा मोसमी गोवन शाकाहारी पदार्थांची लिस्टही मोठी आहे. प्रत्येक वर्षी पावसाळा येताच गोवेकरांना पावसाळी भाज्यांची ओढ लागते. ह्यातली प्रत्येक भाजी कमीत कमी एकदा तरी खाल्लीच पाहिजे असे त्यांचे म्हणणे असते. परंतु खाण्याच्या सवयी बदललेली अधिक वाचा…

देवी लईराई, शिरगांव

लईराई देवीची कथा

कोण आहे लईराई देवी? गोव्यातील अनेक देवतांपैकी एक देवी लईराई. तिचा भक्तगणही मोठा! गोव्यातल्या बहुसंख्य लोकांना जरी लईराई देवीबद्दल माहित असले तरी, कामानिमित्त गोव्यात येऊन राहिलेल्यांना तसेच गोव्यातील मंदिरे पाहण्याची उत्सुकता असलेल्या पर्यटकांना मात्र कोण ही लईराई देवी? असा प्रश्न पडतो. लईराई देवीची कथा अतिशय अद्भुत आहे. लईराई देवी आणि अधिक वाचा…

पर्वरी शिगमोत्सव 2024

पर्वरी शिगमोत्सव २०२४

रविवारी ३१ तारखेला पर्वरी शिगमोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला. पर्वरीमधील शिगमोत्सवाचे हे दुसरे वर्ष. गेल्यावर्षीपासून पर्वरीमध्ये शिगमोत्सव, कार्निवल, नरकासुर वध स्पर्धा इ. सुरु झालेले आहे. आता पर्वरीकरांना हे सारे उत्सव पाहण्यासाठी पणजीला जावे लागत नाही.  पर्वरीकरांचा ह्या साऱ्या उत्सवांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा शिगमोत्सव पाहण्यासाठी लोटलेली प्रचंड गर्दी लोकांच्या उदंड अधिक वाचा…

शिगमोत्सव २०२४

शिगमोत्सव २०२४

फाल्गुन महिना येतो तसा गोव्याला वेध लागतात शिगमोत्सवाचे. सगळे लोक आतुरतेने ह्या शिगमो (शिमगा) सणाची वाट पाहत असतात. आपापल्या एरिया मध्ये कुठल्या तारखेला शिगमोत्सव मिरवणूक आणि चित्ररथ असणार याची लोकांमध्ये उत्सुकतेने चर्चा सुरु होते. ह्यावर्षीचा होळी सण अवघा चार दिवसावर येऊन ठेपलेला आहे. उत्साहाचं उधाण असलेल्या ह्या शिगमोत्सव मिरवणुकीचे वेळापत्रक अधिक वाचा…

Terekhol Fort

तेरेखोल फोर्ट (Terekhol Fort)

तेरेखोल फोर्ट हे नाव मी ऐकलं होतं, तिथे पोहोचण्याची वेळ मात्र यायची होती. ह्यावर्षीच्या डिसेंबर मध्ये ती वेळ आली. तेरेखोल किल्ल्याचा इतिहास तेरेखोल गावातील तेरेखोल नदीच्या किनाऱ्यावर असलेला हा किल्ला सावंतवाडीचा राजा खेम सावंत भोसले यांनी १७ व्या शतकात बांधला. पुढे पोर्तुगीजांनी हा किल्ला एका युद्धामध्ये सावंतवाडीच्या राजाकडून जिंकला. गोवा अधिक वाचा…

मंगेशी जत्रोत्सव

मंगेशी जत्रा- एक आनंददायी अनुभव

माझे कुलदैवत महालसा. तिथे जाताना नेहमी मंगेशी वरून जाणे होत असते. परंतु महालसेला जाताना किंवा येताना मंगेशीला काही जाणं होत नाही. तिथे येणाऱ्या चित्रविचित्र पोषाखातल्या देशी पर्यटकांच्या लोंढ्यामुळे असेल कदाचित पण मंगेशीला जाणे अगदीच क्वचित होत असे. मंगेशी दर्शनाची खूपच ओढ लागली तर मग या बाकीच्या गोष्टींकडे काणाडोळा करून आम्ही अधिक वाचा…

कला अकादमी

कला अकादमी, पणजी

अनेकांचे आवडते पणजी शहर गोवा आणि गोव्याचे राजधानी असलेलं पणजी शहर अनेक जणांना आवडत असेल. त्याच्या ओढीने देश विदेशातील अनेक नागरिक या पणजी शहराला भेट देत असतील. कुणाला मिरामार बीच आणि दोना पॉल आकर्षित करत असेल, आणखी कुणी कॅसिनो आणि क्रूझ च्या ओढीने इथे परत परत येत असतील. कुणाला मांडवी अधिक वाचा…

माझ्या नजरेतून माझा गोवा

गोवा, पर्यटकांचं आवडतं पर्यटन स्थळ!  गोवा! गोवा म्हटलं की गोव्याबाहेरील कितीतरी माणसं आनंदानी डुलायला लागतात. कुठे चार दिवस फिरायला जायचं म्हटलं तर पहिलं नाव असतं गोव्याचं! गोव्याच्या अगदी शेजारी असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच नाही, तर दिल्लीपासून ते खाली दक्षिणेपर्यंत सगळ्यांचं लाडकं पर्यटनस्थळ गोवा! भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकही गोव्याच्या प्रेमात! अधिक वाचा…