गोव्यामध्ये सहसा लोक मासे खाण्यासाठी येतात. परंतु मासे खाण्याची विशेष आवड नसणाऱ्या एखाद्या अट्टल मांसाहारी अर्थात मटण चिकन खाणाऱ्यासाठी गोव्यामधले एक उत्तम रेस्टॉरंट म्हणजे “प्रख्यात मारुती वडा कोंबडा, अस्सल कोल्हापुरी“.

गोव्यातील प्रसिद्ध कोल्हापुरी मटण आणि चिकन रेस्टॉरंट

गोव्यात येऊन अस्सल कोल्हापुरी चिकन आणि मटण खायचे असेल, तर “वडा कोंबडा अस्सल कोल्हापुरी” शिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. झणझणीत मसाले, पारंपरिक कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आणि चविष्ट सुक्का मटण यासाठी हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे.

गोव्याची पारंपारिक चिकन शागुती कुठेही मिळू शकते मात्र अस्सल कोल्हापुरी पद्धतीचे मटण आणि चिकन गोव्यामध्ये सर्वत्र मिळत नाही. त्यामुळेच वडा कोंबडाला स्थानिकांबरोबरच पर्यटकांचीदेखील मोठी पसंती मिळते.

Vada Kombda Restaurant

वडा कोंबडाची प्रेरणादायी सुरुवात

जवळ जवळ २३ -२४ वर्षांपुर्वी म्हणजे साधारण २००२ मध्ये म्हापसा येथे सुरु झालेले प्रख्यात मारुती वडा कोंबडा पुढे २००७ मध्ये पर्वरी येथे स्थलांतरित झाले आणि तेव्हापासून आजतागायत ते आपली गुणवत्ता कायम ठेवत दिमाखात चालू आहे.

गोव्यामध्ये कोल्हापुरी मटण चिकन सुरु करण्याची कल्पना कशी काय आली याबद्दल सांगताना रेस्टॉरंटचे मालक श्री निखिल सावंत सांगतात — १९९९ ते २००१ दरम्यान पणजी येथे भरलेल्या सी फूड महोत्सवामध्ये त्यांनी प्रथमच गोव्यामध्ये आपला स्टॉल घातला होता. त्याला खवैयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला तेव्हाच त्यांच्या मनामध्ये गोव्यामध्ये कायम स्वरूपी अस्सल कोल्हापुरी मांसाहारी जेवण देणारे रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आला आणि त्याची परिणीती २००२ मध्ये  “प्रख्यात मारुती वडा कोंबडा” ह्या म्हापसा येथील रेस्टॉरंटने झाली.

पुढे २००७ मध्ये म्हापसा आणि पणजी अशा दोन्ही ठिकाणच्या लोकांना मध्यवर्ती पडेल अशा पर्वरी ह्या ठिकाणी “वडा कोंबडा अस्सल कोल्हापूरीची” सुरुवात झाली. महामार्गाला अगदी लागून असल्याने पर्यटकांनाही हे रेस्टॉरंट सहज उपलब्ध होते.

कोल्हापूरपासून सुरू झालेला स्वादाचा वारसा

 या रेस्टॉरंटची मूळ सुरुवात कोल्हापूरमध्ये झाली. निखिल यांचे वडील श्री. जयवंतराव सावंत यांनी १९९० मध्ये कोल्हापूर येथे प्रख्यात मारुती वडा कोंबडाची सुरुवात केली. ज्याच्या आता कोल्हापूरमध्ये तीन शाखा आहेत. त्यांचा हा वारसा त्यांच्या मुलांनी पुढे चालवला. त्याच पारंपारिक चवीचा वारसा घेऊन निखिल गोव्यामध्ये आले.

वडा कोंबडाची खासियत

अस्सल कोल्हापुरी जेवण ही वडा कोंबडाची सर्वात मोठी खासियत आहे. मात्र या रेस्टॉरंटला खरी लोकप्रियता मिळाली ती एका वेगळ्या संकल्पनेमुळे कोकणातल्या पारंपारिक कोंबडी वड्याचे वडा कोंबडा असे नामांतरण करून त्या वड्यांबरोबर कोल्हापुरी मटण किंवा चिकन देण्याची ती संकल्पना.  त्यासाठी ते इतके प्रसिद्ध झाले की त्यांना मूलतः वडा कोंबडा म्हणूनच ओळखले जाते. कोल्हापूरचे चिकन आणि कोकणातले वडे हे संयोजन लोकांच्या अत्यंत पसंतीस उतरले.

Chicken Thali, Vada Kombda

प्रसिद्ध कोल्हापुरी मटण आणि चिकन थाळी

मटण थाळीमध्ये काय मिळते?

लोकप्रिय मटण थाळीमध्ये साधारणपणे:

  • मटण ग्रेव्ही
  • तांबडा आणि पांढरा रस्सा
  • वडे किंवा चपाती
  • अंडा करी
  • कोल्हापुरी पुलावा भात
  • सोलकढी

चिकन थाळीमध्ये काय असते?

  • मसालेदार चिकन ग्रेव्ही
  • तांबडा-पांढरा रस्सा
  • वडे किंवा चपाती
  • लिव्हर मसाला
  • कोल्हापुरी पुलावा 
  • सोलकढी

याशिवाय ग्राहकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या थाळ्यांचे पर्यायही उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मुख्यत्वे सुक्का मटण थाळीसुक्का चिकन थाळी लोकप्रिय आहे.

Sukka Mutton, Vada Kombda

झणझणीत तिखट खाणाऱ्या आणि अस्सल मांसाहारी चाहत्यांसाठी खास मेनू

कोल्हापूर साताऱ्याकडचे लोक तिखट, तवंगयुक्त जेवणाला प्राधान्य देतात. अशा ग्राहकांसाठी खास:

  • खर्डा मटण
  • खर्डा चिकन

जे मिरचीच्या ठेच्यामध्ये बनवले जाते.

त्याचबरोबर मांसाहारातील विविध प्रकार ज्यांना खायचे असतात त्यांच्यासाठी

  • खिमा
  • भेजा फ्राय
  • मटण चॉप्स

यासारखे विविध पदार्थ मिळतात.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे इथे तयार केले जाणारे मटण हे खुद्द कोल्हापूरहून मागवले जाते. इथले सुक्का मटण म्हणजे तर सगळ्या पदार्थांवरील कळस आहे.

Egg Thali, Vada Kombda

वडा कोंबडातीलआवर्जून चाखाव्या अशा  इतर थाळ्या

घाटमाथा आणि कोकण या दोन्ही भागांतील ग्राहकांची आवड  लक्षात घेऊन येथे कोल्हापुरीबरोबरच मालवणी चिकन हंडी सुद्धा उपलब्ध आहे.

मटण आणि चिकन हे मुख्य आकर्षण असले तरी येथे पुढील पर्यायही मिळतात:

  • अंडा थाळी
  • फिश थाळी
  • शाकाहारी थाळी

सीफूड आणि शाकाहारी पर्यायही उपलब्ध

फिश थाळीचे प्रकार

फिश थाळीमध्ये पुढील पर्याय मिळतात:

  • प्रॉन्स
  • पापलेट
  • सुरमई
  • बांगडा

शाकाहारी थाळी

शाकाहारी थाळी साधी आणि स्पेशल अशा दोन प्रकारांत मिळते. स्पेशल थाळीमध्ये पंजाबी भाज्या आणि गोड पदार्थामध्ये मुख्यत्वे श्रीखंड दिले जाते.

Veg Thali, Vada Kombda

वडा कोंबडा फक्त थाळीपुरते मर्यादित नाही

सुरुवातीपासून थाळीलाच प्राधान्य दिले जात असले तरी पुढे पुढे ग्राहकांच्या मागणीनुसार तंदुरी, चायनीज सारखे पदार्थही त्यांनी सुरु केले.

असे असले तरी वडा कोंबडा ही अस्सल कोल्हापुरी थाळी खाण्यासाठीच इथे जावे. त्यातही कोंबडी वडा आणि सुक्का मटण हे त्यांचे नावाजलेले विशेष पदार्थ मांसाहारी लोकांनी जरूर चाखावे.

गोव्यातील पर्वरी येथील वडा कोंबडा अस्सल कोल्हापुरी ही त्यांची एकमेव शाखा आहे.

आदित्य वडा पाव – सावंत कुटुंबाचे आणखी एक लोकप्रिय उपाहारगृह

त्याशिवाय त्यांचे “आदित्य वडा पाव” नावाचे आणखीन एक उपहारगृह आहे. कोल्हापुरी वडा पाव, मिसळ आदी पदार्थांसाठी  “आदित्य वडा पाव” प्रसिद्ध आहे. हे उपहारगृह त्यांच्या पत्नी कविता आणि मुलगा आदित्य सांभाळतात.

त्यांच्या ह्या दोन्ही उपाहारगृहांना दै. गोमंतक आणि दैनिक लोकमत पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे.

गोव्यात वडा कोंबडाला का भेट द्यावी?

 जर तुम्हाला मांसाहारी जेवणाची आवड असेल आणि ते ही कोल्हापुरी तर आपल्या गोव्याच्या ट्रीपमध्ये वडा कोंबडा अस्सल कोल्हापुरीचे जेवण एकदा जरूर खावे.

तुम्हाला तुमच्या गोवा टूरच्यावेळी; नॉर्थ गोवा फिरताना, हायवेवर कुटुंबासोबत जेवणासाठी योग्य ठिकाण हवे असल्यास, त्याचबरोबर तुम्ही मटण प्रेमी असाल आणि झणझणीत खायची तुम्हाला आवड असेल, तर त्यासाठी वडा कोंबडा हा उत्तम पर्याय आहे. 

वडा कोंबडा पर्वरीजवळील पाहण्यासारखी ठिकाणे:

या रेस्टॉरंटचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे त्याचे उत्तम लोकेशन.

वडा कोंबडा पर्वरी येथील प्रसिद्ध मॉल द गोवा याच्या अगदी समोर असल्याने रुचकर जेवणाबरोबरच मॉल मध्ये शॉपिंगचाही आनंद लुटता येईल.

याशिवाय जवळच:

सुद्धा सहज पाहता येतील.

म्हणूनच नॉर्थ गोवा फिरताना वडा कोंबडामध्ये जेवणाचा बेत करणे अत्यंत सोयीचे ठरते.

कॅटेगरी Goan Food chains

error: Content is protected !!