ठाकरवाडी आदिवासी कलादालन

ठाकरवाडी आदिवासी कलादालन

सरसोली धामचे प्रसन्न दर्शन घेतल्यानंतर कुडाळमधून गोव्याच्या दिशेला जाताजाता वाटेतच ठाकरवाडी येथे श्री गणपत मसगे ह्यांनी स्थापन केलेले कलादालन असल्याचे कळले.  खरं तर केवळ वाटेत जाता जाता लागते  म्हणून आम्ही इथे आलो होतो. पण ह्या कलादालनाचे वेगळे पण; जुन्या नष्ट होत चाललेल्या लोक कला, पारंपरिक वस्तू आणि दुरावलेली संस्कृती यांची ओळख अधिक वाचा…

सरसोली धाम, कुडाळ

सरसोली धाम, कुडाळ

काही महिन्यापूर्वी  वेंगुर्ला, मालवण, कुडाळ येथे तीन चार दिवसाच्या प्रवासाला आम्ही गेलो होतो. वेंगुर्ला आणि मालवण पाहिल्यानंतर गोव्याला परतताना आम्ही कुडाळ पाहायला गेलो. पहिल्या दिवशी.पिंगुळीचा श्री राऊळ महाराज मठ पाहिल्यानंतर दुसऱ्यादिवशी सर्व प्रथम सरसोली धाम हा सिंधी समाजाचा मठ पाहायचे असे आम्ही ठरविले. तिथे जाताना वाटेत आम्हाला, भारतातले पहिले साई अधिक वाचा…

राऊळ महाराज मठ , पिंगुळी कुडाळ

श्री राऊळ महाराज मठ, पिंगुळी, कुडाळ

मालवणचे रम्य दर्शन घेऊन आम्ही कुडाळच्या दिशेने निघालो. वाटेत भराडी देवीचे दर्शन घेऊन साधारण चारच्या दरम्यान आम्ही कुडाळ गाठले. शहरांमध्ये शिरता शिरताच सद्गुरू वामनराव पै यांच्या विश्वप्रार्थनेचा फलक लक्ष वेधून घेत होता. कुडाळ म्हणताच पहिल्यांदा ध्यानात येते ते पिंगुळी. पिंगुळी मध्ये भेट देण्यासारखी दोन स्थाने आहेत. एक तर श्री राऊळ अधिक वाचा…

शिवाजी महाराज, राजकोट, मालवण

मालवण – शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विलोभनीय दर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आदल्या दिवशी मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिल्यानंतर आम्ही इतर काही ठिकाणे पाहण्यासाठी सकाळी दहाच्या दरम्यान हॉटेल सोडले. प्रथम आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी गेलो. नुकतेच म्हणजे ४ डिसेंबरला  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. ४ डिसेंबर हा नेव्ही दिवस म्हणून साजरा केला जातो. अधिक वाचा…

सिंधुदुर्ग किल्ला मालवण

मालवण -1

मालवण पाहायला जायचे ही इच्छा फार दिवसापासून मनात होती त्याचे एक कारण म्हणजे सिन्धुदुर्गचा किल्ला आणि दुसरे कारण मालवणी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद. शिवाय हल्लीच, म्हणजे आम्ही तिथे जाण्याच्या फक्त पंधरा दिवस आधी पंतप्रधान मोदीजींनी अनावरण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हे ही एक आकर्षण होतेच. आम्ही वेंगुर्ला सोडलं आणि मालवणच्या दिशेने, परुळे अधिक वाचा…

मांडवी नेचर होम स्टे वेंगुर्ला

मांडवी नेचर स्टे (Home stay in Vengurla)

कुठेही प्रवासाला गेलं की पहिला प्रश्न येतो तो राहण्याचा. एक स्वच्छ सर्व सोयींनी युक्त जागा आपल्याला विश्रांतीसाठी हवी असते. त्याप्रमाणे आपण हॉटेल शोधतो. आणि ह्या बेसिक गरजा पाहून एकाची निवड करतो. आमची वेंगुर्ला सफर अचानक ठरलेली.  हॉटेल, होम स्टे वगैरेचा ऑनलाईन शोध न घेता आम्ही डायरेक्ट गेलो होतो. आम्ही पोचलो अधिक वाचा…

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला सफरनामा २

वेंगुर्ला शहर वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, अरवली इत्यादी ठिकाणे पाहिल्यानंतर आम्ही वेंगुर्ला शहराच्या दिशेने निघालो. वेंगुर्ला शहर पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग. दुपारचे साधारण साडे तीन होऊन गेले होते. आधी एखादे हॉटेल बुक करावे, जेवावे आणि नंतर इथे पाहण्यासारखे काय आहे त्याची चौकशी करून बाहेर पडावे असा आम्ही विचार केला होता. परंतु अधिक वाचा…

रेडी बीच वेंगुर्ला

वेंगुर्ला सफरनामा  १

महाराष्ट्राच्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी भेट दिली होती ती रेडीच्या स्वयंभू गणपती आणि शिरोड्याच्या वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो होतो तेव्हा…. त्यानंतर पुन्हा रेडी आणि परिसर परत एकदा पाहण्याची संधी नुकतेच कोकण प्रवासाला गेलो असता मिळाली. तर हा वेंगुर्ला सफरनामा तुमच्यासाठी. गणपती अधिक वाचा…