आंबाड्याची करम

आंबाड्याची करम

गोवा आणि कोकण किनारपट्टीतील प्रदेशात आंबाडे म्हणून ओळखले जाणारे आंबट फळ मिळते. गोवन स्वयंपाकामध्ये ह्या आंबाड्याचे विविध पदार्थ बनवले जातात. गोव्यातील काही घरांच्या अंगणात किंवा परसदारी आंबाड्याचे झाड तुम्हाला दिसू शकते. साधारण श्रावण महिन्यात यायला सुरु होणारे हे फळ दिवाळी पर्यंत मिळते. श्रावणामध्ये कोवळे असणारे, हिरवट पोपटी रंगाचे आंबाडे दिवाळीपर्यंत अधिक वाचा

रोसातले फोव

रोसातले फोव- नारळाच्या दुधातील पोहे

कोकणी भाषेत पोह्यांना फोव म्हटले जाते आणि रोस म्हणजे रस. नारळाचे दूध अथवा रसामध्ये केलेल्या ह्या पोह्यांना म्हणूनच रोसातले फोव म्हणतात. गोव्यामध्ये दिवाळीला पोह्यांना विशेष महत्व असते. पोह्याशिवाय दिवाळीची कल्पना इथे करताच येत नाही. विविध तऱ्हेने बनवलेल्या पोह्यांनी दिवाळीचे ताट सजलेले असते. पोह्याचे प्रकार तर किती म्हणता? दुधातले फोव, बटाटे अधिक वाचा

दुधातले पोहे

दूध पोहे (दुधातले फोव)

गोव्यामध्ये दिवाळीत पोहे हा अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. दिवाळी म्हणजे पोहे आणि पोहे म्हणजे दिवाळी असं इथलं साधं सोपं समीकरण आहे म्हणा ना! दुधातले फोव हा असाच एक पोह्याचा पदार्थ दिवाळीला बनवला जातो. नरकचतुर्दशीला सकाळी जे पोह्याचे विविध पदार्थ बनवले जातात त्यामधला एक म्हणजे हे दूध पोहे! दिवाळीच्या जवळपास बाजारामध्ये अधिक वाचा

अळू वडी

अळू वडी

अळू वडी हा लहान थोर सगळ्यांचा आवडता पदार्थ! लहान मुले अळूची पातळ भाजी किंवा अळूचे फतफते खाणार नाहीत पण अळूची वडी खाण्यास त्यांचा कधीही नकार नसतो. आज मी तुम्हाला गोव्यात बनवली जाणारी अळू वडी कशी करायची ते सांगणार आहे. सहसा बेसन मध्ये बनवली जाणारी ही अळूची वडी; गोव्यामध्ये, भिजवलेल्या तांदुळाची अधिक वाचा

Maskachi Bhaji

मस्काची भाजी

शेवग्याच्या भाजीला गोव्याच्या कोकणी भाषेमध्ये मस्काची भाजी म्हणतात. शेवग्याच्या पानांची ही भाजी गोव्यामध्ये पावसाळ्यात भरपूर मिळते. मस्काची भाजी पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असल्याने पावसाळ्याच्या मोसमात गोवेकर ही भाजी एकदा तरी जरूर खातो. बहुगुणी शेवग्याचे औषधी महत्व आता लोकांनाही कळू लागले आहे. विविध व्हिटॅमिन्सनी भरपूर, वजन कमी करण्यासाठी व रक्तातील साखरेचे अधिक वाचा

Akur Masurache Tondak

आकूर मसुराचे तोंडाक

गोव्यामध्ये पावसाळ्यात विविध प्रकारच्या पावसाळी भाज्या मिळतात. ह्या पावसाळी भाज्यांमधली एक भाजी म्हणजे आकूर. पावसाळ्यामध्ये नदीकाठी मिळणारी ही भाजी कोवळ्या अंकूर स्वरूपात मिळते. तांबूस हिरव्या रंगाचे हे लांब पातळ कोवळे आकूर साधारण शतावरीसारखे दिसतात. ताज्या ताज्या आकूरची, मसूर, चणा डाळ किंवा नुसत्याच खोबऱ्याच्या वाटणाबरोबर केलेली पातळ भाजी अथवा तोणाक अत्यंत अधिक वाचा

Govan Vegeterian Thali

गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ 

गोव्यातील लोकांचा आहार प्रामुख्याने मासे असला तरी इथे शाकाहारी पदार्थ सुद्धा बनवले जातात आणि आवडीने खाल्लेही जातात. गोव्याचे पारंपरिक शाकाहारी पदार्थ कुठले ते आता आपण जाणून घेऊ.   पारंपारिक खाद्यपदार्थांची समृद्ध विविधता पारंपारिक गोवन शाकाहारी पदार्थामध्ये जी नावे सर्वप्रथम येतात; त्यामध्ये मुगागाठी, खतखते, आळसांदे, चवळीचे तोंडाक (म्हणजे पातळ उसळ), बटाट्याची पातळ आणि अधिक वाचा

अनसाचे सासव

अनसाचे सासव

“अनसाचे सासव” अर्थात अननसाचा आंबट गोड गोवन पदार्थ! सासव हा एक पारंपरिक गोवन पदार्थ आहे. ह्या पदार्थामधील एक टाळता न येणारा घटक म्हणजे मोहरी, ज्याला कोकणी भाषेत सासवा म्हणतात. घोटा अर्थात रायवळ आंबे घालून केलेले घोटाचे सासव हे जास्तीजास्त लोकांचे अधिक आवडते असले; तरी अननस वर्षभर मिळत असल्याने आंब्याचा मोसम अधिक वाचा

बिमलाचो रोस

बिमलाचो रोस

आंबट तिखट बिमलाचो रोस म्हणजे बिमल ह्या फळापासून बनवलेली आमटी. खोबऱ्याच्या वाटणातील ही आमटी खास चवीची असते. बिमल हे एक आंबट फळ आहे जे दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या प्रदेशात आढळते. बिंबल किंवा बिलिंबी म्हणूनही ओळखले जाणारे हे फळ विशेषतः गोवा, महाराष्ट्र, केरळ आदि राज्यांमध्ये पाहायला मिळते. बिमलाच्या  झाडाला उष्ण, दमट हवामान अधिक वाचा

सेर्रादुर्रा

सेर्रादुर्रा

“सेर्रादुर्रा” हा एक पोर्तुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे, “लाकडाचा भुसा”. मारी बिस्कीटची पावडर, जी अगदी लाकडाच्या भुशासारखी दिसते तिचा वापर करून केलेल्या ह्या गोड पदार्थाला म्हणूनूच सेर्रादुर्रा हे नाव पडले. सॉ डस्ट पुडिंग म्हणूनही ओळखले जाणारे हे एक पोर्तुगीज पुडिंग आहे. जे पोर्तुगाल इतकेच गोव्यामध्येही प्रसिद्ध आहे. विविध गोवन अधिक वाचा

error: Content is protected !!