मी मेघा प्रभुदेसाई. 

गेली पंचवीस वर्षे माझे गोव्यात वास्तव्यआहे.

ह्या पंचवीस वर्षात गोव्याचा निसर्ग, गोव्यातील मंदिरे, इथली संस्कृती आणि परंपरा पाहिल्याअनुभवल्या आणि त्यांच्याशी इतकी एकरूप झाले की मी जन्माने गोवेकर नाही याचा मला संपूर्ण विसर पडला

केवळ गोवेकराशी लग्न केलं ह्या कारणासाठीच मी गोवेकर  होता मी गोव्याशी आत्म्याने जोडले गेलेगोव्यात मला माझा शोध लागलामाझ्या लेखन गुणांना वाव मिळाला. अध्यात्मिक उन्नती करण्यास पोषक वातावरण मिळालं

आजपर्यंत गोव्यातील विविध वर्तमानपत्रातून आणि मासिकातून मी लेखन केले आहे.

माझ्या गोव्याचं खरं सौन्दर्य लोकांपर्यंत पोहोचावं ह्या मनोकामनेतून हा ब्लॉग लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

अशा ह्या माझ्या गोव्यातीलमंदिरे,सणसंस्कृतीनिसर्ग,खाद्यसंस्कृती वगैरे सर्वांसमोर आणणे हा या ब्लॉगचा उद्देश आहे