सोयरा’ज! पणजीतील पाटो येथील कदंब बस स्टॅन्ड जवळील व्हेज, नॉन-व्हेज रेस्टॉरंट.

सोयरा’ज म्हणजे एका मराठमोळ्या स्त्रीच्या कष्टाची यशोगाथा. महाराष्ट्रातून पतीसोबत गोव्यात स्थायिक झालेल्या ह्या जिद्दी महिलेने आपण काहीतरी करायचंच हा ध्यास घेतला होता. त्या ध्यासातून स्वतःच्या आवडीची अशी विशेष हातखंडा असलेली पाककला मदतीला आली आणि सुरुवात झाली सोयरा’जची. 

पणजी शहर हे अधिकाधिक चाकरमान्यांचे शहर. पाटो भाग तर सरकारी आणि व्यावसायिक कार्यालयांचे केंद्रच. अशा अत्यंत सुयोग्य स्थानी नोकरदारांना, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना अगदी घरच्या चवीचे लज्जतदार स्नॅक्स आणि जेवण मिळण्याचे ठिकाण म्हणजे सोयरा’ज! 

इ.स. २००२ मध्ये सोयरा’जला सुरुवात झाली ती रोल आणि बिर्याणीने. मग ग्राहकांनी चहाची मागणी केल्यावर; चहा, आणि चहासोबत स्नॅक्स म्हणून सँडविच व वडापावही सुरु झाले. आजूबाजूच्या ऑफिस मधील लोकांना ह्याचा खूप फायदा झाला आणि त्यातूनच दुपारच्या लंचचीही सुरुवात झाली.

सोयरा’जची चव एकदा चाखलेल्या माणसाची पावले तिथल्या विविध पदार्थांच्या चवीच्या ओढीने पुन्हा तिथे वळली नाहीत तर नवल. त्यामुळे दिवसेंदिवस ग्राहकही वाढू लागला. पण इथे खुर्च्यांची सोय नसल्यामुळे व केवळ उभे राहून खाण्यासाठी टेबल असल्यामुळे; इथली चव चाखल्यानंतर पुन्हा येणाऱ्या वृद्ध, महिला, लहान मुले अशा ग्राहकांसाठी ते गैरसोयीचे होऊ लागले.  ह्या गैरसोयीचा विचार करून सोयरा’जच्या दुसऱ्या शाखेची सुरुवात कोविडच्या दोन वर्ष आधी पाटो येथील गेरा’ज ग्रँड मध्ये सुरु झाली. जेथे ग्राहकांना आरामात बसून विविध पदार्थांचा स्वाद घेता येतो. 

व्हेज, मटण आणि चिकन बिर्याणी ही सोयरा’जची स्पेशालिटी. त्याचबरोबर चिकन सुका, मटण सुका, व्हेज, नॉन-व्हेज कटलेट पाव, अंडा मसाला, बटाटा वडा, समोसा, वडा पाव, सँडविच असे सर्वच पदार्थ अत्यंत रुचकर. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून सोयरा’ज मध्ये कुठल्याही पदार्थांमध्ये फूड कलर व प्रेझर्वेटिव्हज् वापरले जात नाही. तळलेले पदार्थही रोजच्या रोज ताज्या सनफ्लॉवर तेलामध्ये तळले जातात. 

लाजवाब चव आणि आरोग्याची हमी ह्या दोन कारणास्तव अधिकाधिक लोक येथील माफक दरातील दुपारच्या जेवणाचे  व सकाळच्या नाश्त्याचे पार्सल नेतात. दुपारच्या व्हेज जेवणामध्ये चपाती, सुकी भाजी, पातळ  भाजी, शिरा, पुलाव, आणि रायते असते. नॉन व्हेज मध्ये चिकन अथवा मटणचा मसाला किंवा सुका, बिर्याणी, रायता, आणि दोन चपात्या असतात. शिवाय चिकन, मटण, अंडा मसाला/सुका आणि दोन चपात्या असे मिनी लंचही मिळते. तर नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, इडली, मिसळ पुरी, मिसळ पाव, इ. पदार्थ मिळतात. सोयरा’जचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा संपूर्ण महिला स्टाफ! आपण एक स्त्री असल्याचे भान ठेवत सोयरा मोहितेंनी अनेक गरजू महिलांना रोजगाराची संधी मिळवून दिली. ह्या प्रत्येक स्टाफला घरच्या जेष्ठ महिलेप्रमाणे सोयराताईंचे प्रेम व आपुलकी मिळते. हाच आपलेपणा इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकालाही मिळतो. 

तुम्ही जर अजूनपर्यंत सोयरा’जच्या लज्जतदार पदार्थांची चव चाखली नसेल तर सोयरा’जला जरूर भेट द्या. सोमवार पासून शनिवारपर्यंत  सकाळी ९ ते ५ ह्या वेळेत तुम्ही कधीही सोयरा’जला भेट देऊ शकता. 

कॅटेगरी Goan Food chains